रणभूमीवर यंत्रमानव


रणभूमीवर यंत्रमानव

आदीम काळापासून चालत आलेली युद्धे हा मानवी संस्कृतीला अभिशाप आहे की वरदान याचा अंदाज लावणे कठीण आहे. युद्ध हा समस्या सोडविण्याचा शेवटचा उपाय असला तरी बऱ्याचदा युद्धांनी वा युद्धजन्य परिस्थितीने मानवीप्रगतीला हातभार लावला आहे, हे शंभर टक्के खरे आहे. अनेक शोध व तंत्रज्ञान युद्धोपयोगी ठरू शकतील म्हणून शोधले गेले आहेत तर अनेक मुलकी शोध व तंत्रज्ञान युद्धोपयोगी ठरू शकतील म्हणून आणखी प्रगत व वैशिष्ट्यपूर्ण झाले आहेत. असाच एक मुलकी प्रयोग आहे यंत्रमानव आणि संगणकाचा. आतापासून पुढची युद्ध बहुधा हायटेक यंत्रमानवाच्या सहाय्याने लढली जातील, अशी चिन्हे आहेत. त्याची थोडीशी झलक १९९१च्याआखाती युद्धाने आपल्याला दाखवून दिली आहेच. आता त्याही पुढची कडी ठरणारं संशोधन अमेरिका तसेच इतर पाश्चात्य राष्ट्रातून चाललं आहे.

त्यात अगदी आपल्या भारतासारखा देशही मागे नाही. डीआरडीओने त्यादृष्टीने २००७ पासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. 'रोबो' हा शब्द म्हणजे चेकोस्लोव्हाकियन लेखक कारेल कापेलच्या विज्ञान नाटिकेची इंग्रजी भाषेला देणगी आहे. १९२१ साली आलेल्या या नाटिकेत यंत्र-मानवांना खलनायक म्हणून समोर आणले गेले होते. म्हणजेच यंत्रमानव ही विज्ञानलेखकांची एक प्रत्यक्षात उतरलेली कल्पना आहे. कापेकनंतरच्या लेखकांनी यंत्रमानवाला मानवाचा मित्र व शत्रू दोन्ही स्वरूपात पेश केलं. विज्ञानकथाकारांच्या परिकल्पनेतला यंत्रमानव अष्टपैलू व सर्वगुणसंपन्न असला, तरी संगणक नावाचा यांत्रिक मेंदू हा यंत्रमानवाचा आत्मा आहे. संगणक शास्त्रात प्रगती झाल्यानंतरच यंत्रमानवाच्या सर्वगुणसंपन्नतेचा मार्ग खुला झाला. मात्र यंत्रमानवाच्या युद्धभूमीवरील प्रवेशाबाबत गांभीर्याने विचार झाला तो व्हिएतनाम युद्धानंतरच. या युद्धात अमेरिकेसारख्या तथाकथित महासत्तेचे ५०,००० सैनिक व्हिएतनामसारख्या टिचभर देशाच्या आगळ्यावेगळ्या युद्धतंत्रापुढे मारले गेले. अमेरिकेच्या आधुनिक साधनांनिशी लढणाऱ्या सैन्यापुढे गमिनी कावा तसेच बूबी ट्रॅप व भूसुरूंगाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर हे युद्ध लढले गेले. बूबी ट्रॅप हा दातेरी जबड्यासारखा असून अनेक सैनिकांचे पाय त्यात अडकून कापून पडले, तर भुसुरुंगानीही अमेरिकन सैन्यांची जीवितहानी मोठ्या प्रमाणावर केली. या हानीमुळे पेन्टागॉनचंलक्ष यंत्र-मानवांकडे जाऊन संबंधित संशोधनाला सुरुवात झाली.

सर्वसाधारणपणे यंत्रमानव म्हटला की, विज्ञानकथांतून किंवा विज्ञानपटातून दाखवितात तसा मानवसदृश व चपळाईने हालचाली करणारा यांत्रिक प्राणी आपल्या नजरेसमोर येतो. प्रत्यक्षातला यंत्रमानव म्हणजे वेगळं प्रकरण असतं. पेन्टागॉन पुरस्कृत संशोधनातून १९८४ साली तयार ऑडेक्स-१ हा यंत्रमानव पाहिला तर आपल्याला त्याची कल्पना येईल.ऑडेटिक्स नावाच्या कंपनीकडून त्याची निर्मिती करू घेण्यात आली होती. हा यंत्रमानव षट्पाद म्हणजे सहा पायाचा व वजनाला चांगलाच १७० किलोग्रॅमचा होता. आघाडीवरील सैनिकांच्या पुढे राहून सुरुंग शोधणं हे त्यांचं मुख्य काम, ऑडेक्सच्या-१ च्या मेटल डिटेक्टरने सरुंगाची नोंद केली की तसा संदेश तो आपल्या पाठीमागे काही अंतरावर असलेल्या सैनिकांकडे पाठवित असे. मग तो सैनिक ऑडेक्स-१ ला काही अंतर मागे घेऊन ऑडक्स-१ वरच बसविलेल्याबझुका नावाची छोटी तोफ डागून तो सुरुंग नष्ट करीत असे. अर्थातया सहापायी यंत्रमानवाच्या सहा पायात तज्ज्ञांना यश न आल्याने हा प्रयोग मागे पडला आणि युद्धभूमीवर यंत्रमानव पाठविण्याचा वैज्ञानिकांचा उत्साहही. हा उत्साह भरात यायला कारण ते आखाती युद्धाचे. १९९१ सालचे आखाती युद्ध हे विसाव्या शतकात लढले गेलेले सर्वात हायटेक युद्ध होते. पायोनियर फिनिक्ससारखे वैमानिकरहित विमानं, टोमाहॉकसारखी व पेट्रीयटसारखी क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रे या युद्धात प्रभावीपणे वापरली गेली. पायोनियर हे विमान रडारचं जॅमिंग करण्यासाठी तर फिनिक्स हे विमान तोफखान्याला आपला मारा अचूकपणे करता यावा यासाठी लेसर किरणांद्वारे लक्ष्य निर्धारित करण्यासाठी वापरण्यात आली. टोमाहॉकसारख्या क्षेपणास्त्रांनी १२०० किलोमीटर लांबीवरूनच लक्ष्यांचा अचूकपणे वेध घेतला. हायटेक व लांबून नियंत्रित करता येणाऱ्या शास्त्रांमुळे युद्ध जिंकण्यासाठी अमेरिकेचे फक्त १४७ सैनिक मारले गेले, तर याउलट इराकी सैन्यांचा आकडा होता.१,००,००० सैनिकांएवढा. ही एवढी मोठी तफावत पुन्हा युद्धभूमीवरील यंत्रमानवाच्या उपयोगितेची देण्यास पुरेसं आहे. परिणामी उपयोगीयंत्रमानवाबाबतच्या संशोधनासाठी पेन्टागॉनने ३४० अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करून दिला. पेन्टागॉनची ही गुंतवणूक वाया गेलेली नसल्याची पावती अफगाणिस्तान येमेन ते अगदी पाकिस्तानातील वझिरीस्तानात केलेल्या यंत्रमानवाच्या कामगिरीने जगाला करून दिली आहे. या दूरनियंत्रित यंत्राची कामगिरीच भविष्यकालीन युद्धं अधिकाधिक रोबोटिक असतील, याची ग्वाही द्यायला पुरेशी आहेत, याचाच दुसरा अर्थ असा की विज्ञानकथाकारांनीकल्पिलेलीयंत्रमानवाची मित्र अन् शत्रू अशी दुहेरी भूमिका प्रत्यक्षात येण्याची शक्यता ही आता फक्त शक्यता उरलेली नाही. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीने म्यूल तसेच बर्डडॉग नावाचे दोन यंत्रमानव तयार केले आहेत. त्यातील म्यूल हा सहाचाकी यंत्रमानव आहे. त्याच्या सहाही चाकांसाठी स्वतंत्र इंजिन तसेच सस्पंशनची सोय करण्यात आल्यामुळे खडबडीत जमिनीवरून एक मीटरच्या खड्यातून तसेच चढ पार करून जायची त्याची क्षमता आहे. जमिनीला समांतर दिशेत ३६० अंशात फिरणारं टरेट त्यावर असून त्यावर चार रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र तसेच ७.६२ मिमी ची मशिनगन बसविलेली आहे. टरेटवरच फुटबॉलसारखा सेन्सर बसविलेलं असून शत्रूचा वेध घेण्यास तेसमर्थ आहे.

नजिकच्या काळात १,५०० म्यूल अमेरिकन लष्कराच्या दिमतीला देण्यात येतील तर बर्डडॉग या विचित्र नावाचा यंत्रमानव सैनिकांचा सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी तयार करण्यात आला असून तो बहुउपयोगी आहे. या यंत्र-मानवाला नियंत्रित करण्यासाठी सैनिकांच्या वखांवरच छोट्या ट्रांसमीटरची सोय केली असून त्यातून निघणाऱ्या रेडिओ तरंगाचा मागोवा घेत हा यंत्रमानव सैनिकामागोमाग जात राहतो. सैनिक आपल्या गुढग्यांवर बसून शत्रूच्या दिशेने गोळ्या झाडू लागताच यंत्रमानवही गोळ्यांची दिशा पाहून त्यावर बसविलेल्या मनिशगनचा मारा शत्रूवर सुरू करतो. सैनिकाला संरक्षण देण्याबरोबरच सैनिकाला लागणारी रसद प्रथमोपचार पेटी, काडतुसं तसेच हातबॉम्ब पोहोचविण्याची जबाबदारीही बर्डडॉगवर आहे.

या दोन लढाऊ यंत्रमानवांना तशी फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. मात्र प्रिडेटर तसेच एक्स-४५ या दोन वैमानिकरहित रोबोटिक विमानांना मात्र चांगलीच प्रसिद्ध मिळालेली आहे. प्रिडेटर हे साडेचार टन वजनाचं व अकरा मीटर लांबीचं आहे.त्याचा पल्ला जवळजवळ ७३५ किालोमीटर इतका आहे. हेरगिरीसाठी तसेच हल्ल्यांसाठी हे पायलटरहित विमान वापरण्यात येते, त्यावर शत्रूवर हल्ल्यासाठी हेलफायर नावाची लेसर मायटेड क्षेपणासे बसविलेली आहेत. दुसरं एक्स-४५ हेवैमानिकरहित विमान ५.४ टन वजनाचं असून २००० किलोग्रॅम वजनाची शस्त्र वाहून नेऊ शकतं. त्याच्या पंखाखाली क्षेपणास्त्र अडकविण्याचीही सोय आहे. दहशतवाद्यांचे छुपे अड्डे नष्ट करण्यासाठी या विमानांचा खास उपयोग केला जातोय.

                                                                           © :- पंकज कालुवाला 


No comments