आतला आवाज ....

अरे,असं केलं असतंस तर असं झालं असतं...
अरे,तसं केलं असतंस तर तसं झालं असतं...
तुझ्याकडे हे असतं,तुझ्याकडे ते असतं 
तुझ्याकडे ते असतं,तुझ्याकडे हे असतं 
पण यातल्या अनेकांना 
हे-ते सोडूनच
आता जे आहे ते मिळवायलाच मी बाहेर पडलो
हेच माहीत नसतं...
.
.
तेव्हा
कशाला असले सल्ले देताय राव ?.....
व्हायचं तेच झालं असतं !...
आजपर्यंतच्या कोणत्या निर्णयाचा पश्चाताप झालाय ?..
तर नंतर तो करायची वेळ येईल ??..
हूरहूर-हळहळ फार थोड्या काळासाठी वाटते..
नंतर नियतीने आपल्यासाठी घेतलेला निर्णय योग्यच असतो
हे वेळोवेळी पटत राहते....
आतला आवाज मी नेहमी ऐकतो ते त्यासाठीच !!...


No comments