पैसा म्हणजे सिक्स्थ सेंस ??????....

काही वर्षांपूर्वी एफ.एम रेडिओवर पहाटे पहाटे एक रेडिओ जॉकी छान छान निवेदन करायची,छान छान गाणी ऐकवायची.. 
.
गाणी ऐकवता ऐकवता तिने आपलं स्वत:चं आगळंवेगळं तत्वज्ञान ऐकवलं. एका ओळीचं तत्वज्ञान होतं ते...! 
.
काय होतं विचारता ?... 
.
ती तिची तत्वज्ञानी ओळ होती...
.
"पैसा म्हणजे सिक्स्थ सेंस !"
.
ते अजब तत्वज्ञान ऐकून आमच्या कानाचे पडदेच फाटले. कारण आम्ही पैसा महत्वाचा,पण पैश्यांपेक्षा माणूस महत्वाचा मानणारी आणि त्यात स्वत:ची थोडीफार फसवणूक जरी झाली तरी त्याकडे खेळीमेळीने पाहणारी माणसं ! आमचंही एका ओळीचं एक तत्वज्ञान आहे....
.
"सद्सद्विवेकबुद्धी म्हणजेच सिक्स्थ सेंस !" ❤️❤️

No comments