प्राण जाई पर "लेखणी" न जाई...
सतत विचार,सतत लिहिणं...कधीतरी थोडासा शीणवटा येतो...
त्यादिवशीही लिहिता लिहिता थोडा थकलो..
लिहित्या लेखणीला थांबवून थोडा वेळ तिच्याकडेच पाहात राहिलो...
हसलो...
तुलाही थोडा आराम देतो म्हणत लेखणीलाही
मी शर्टाच्या डाव्या खिश्यात जपून ठेवतो...
त्याच खिश्यावर हात ठेवत मी गुणगुणतो.....
.
"तुझे प्यार करते करते,यह जिंदगी बित जाए.."
.
.
त्याचवेळी नेमकी "ती" येते,फिदीफिदी हसत माझ्याकडे पाहते
म्हणते,"तू असा कसा,असा कसा.....वेडा-वेडा !"
मी दचकतो...
तिच्याकडेच पाहतो...
गहिवरल्यासारखे करतो,डोळे पाणावतो...
तिचं लक्ष नाही पाहून हळूच दात विचकतो
स्वारी खुशीत येते,तशीच निघून जाते
त्या तशा पाठमोर्या डुलतडुलत जाणार्या
अगडबंब-बगडबंब देहाकडे पाहात
मी मनाशीच म्हणतो,"अहाहा ! काय ते ध्यान !! शरीराने आणि वयाने दिन दुनी रात चौगुनी वाढली तरी मेंदूने ककुली-बबुलीच राहिली. राजू-रघू,रवी-अवी बरोबरच म्हणत होते. बरं झालं ब्याद गेली !"
.
मी पुन्हा डाव्या खिश्यातून "लेखणी" काढतो
प्रेमातिशयाने तिच्याकडे पाहतो....
लिहितो....
.
"तुझे प्यार करते करते.....
प्राण जाई पर "लेखणी" न जाई..."

No comments