अवतार,अवतार....

आपल्या भारतीय संस्कृतीत किंवा भारतीय जनमानसात अवतारांच मोठं स्तोम आहे,हे खरंच आहे. पण याच वेळी दुर्लक्षित गेलेला एक मुद्दा म्हणजे बहुतांश मोठे अवतार संपवायला कारणीभूत ठरलाय तो सामान्यं माणूसच...
.
अगदी श्रिकृष्णाचा अवतार संपवलाय एका सामान्यं पारध्याने.. 
.
सांगायचा मुद्दा हा की, राजकारण असो,समाजकारण असो,साहित्य असो वा कोणतंही क्षेत्र असो त्याचं केद्र सामान्यं माणूस,त्याच्या समस्या,त्यावरच्या उपाययोजना आणि त्याचं एकूण उत्थान हाच असला पाहिजे. त्यापासून आपण जसजसे दूर जाऊ लागतो तसं सामान्यं माणूस कोणतंही क्षेत्र असो वा अगदी अवतार, ते संपवतो....

No comments