कुणी “गर्ल” देता का रे “गर्ल”!...

मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे 
डोळ्यात अंगार अन मुखात तुझ्या काटे-सुरे 

आग्या वेताळाची “आज्जी” तू 
तुझ्या नजरेच्या अंगारांनी
भाजले अंग सारे
जिव्हेच्या फटकार्‍यांनी तुझ्या
चेहर्‍यावर उठले चांद-तारे
.
वस्त्रांची लक्तरं झाली
केसांच्या झाल्या जटा
लिहित्या लेखणीच्या आमच्या
कधीच झिजल्या कडा
.
झिजल्या लेखणीच्या या कोवळ्या झरण्याला
कुणी “गर्ल” देता का रे “गर्ल”!

No comments