एकाचा "कम्फर्ट झोन" दुसर्‍यासाठी "यातनागृह"

एकाचा "कम्फर्ट झोन" दुसर्यासाठी "यातनागृह" ठरू शकतो.... 
.
पुस्तकलिखाणात मिळणारी प्रसिद्धी पाहून काम शिकण्याच्या बहाण्याने माझ्याकडे आलेले काही लोक दोन-चार दिवसातच पळून गेले.... 😄😄
.
कोणताही "कम्फर्ट झोन" वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर,त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करण्याची तयारी असल्यानंतर,त्या क्षेत्राशी तुमची नाळ जुळल्यानंतरच तयार होत असतो. 
.
"कम्फर्ट झोन" ही मजा मारण्याची जागा नसते. तर तुम्ही स्वत:साठी,कुटुंबासाठी,समाजासाठी,देशासाठी जी गोष्ट तुम्हाला सगळ्यात चांगली जमते,आवडते,त्यासाठी वाहून घ्यायची तुमची तयारी असते ती करण्यासाठी तयार केलेली स्वत:ची अशी मोकळी जागा म्हणजेच "कम्फर्ट झोन".
.
तुम्हाला बाहेरून काहीही वाटलं तरी माणसं आपापल्या "कम्फर्ट झोन"मध्ये काही झक मारत बसलेली नसतात. प्रत्येकाच्या बुडाखाली काही ना काही आग लागलेली असते आणि दुसरा फक्तं आपली मजा पाहतोय, असा आपला समज झाल्याने आपल्याला तसं वाटत राहतं इतकच.

No comments