कधी कधी काही मुली......
कधी कधी काही मुली विचीत्र असतात.
नेमक्या त्याच आपल्याला भेटतात.
कॉलेजात असताना आम्ही त्यांना "भेजा फ्राय" म्हणायचो ! ही ही ही!!!..
अशीच एक मलाही भेटली होती कधीतरी...
सदा वैतागलेली...
त्याही दिवशी तशीच वैतागली होती.
कावलेली होती...
तोंडाने बरंच काही बरळत होती..
म्हणत होती," तुम्हा निबर मनाच्या पुरूषांना बायकांची दु:खं,बायकांच्या समस्या कळायच्याच नाहीत,कळत नाहीत."
म्हटलं,"बरं ! तूझंच खरं !!"
स्वारी थोडी रंगात आल्यासारखी वाटली.
तिरका कटाक्ष टाकत म्हणाली," मासिक पाळीत आम्हा बायकांना काय त्रास होतो माहितेय ? अंग अंग ठणकतं,दुखतं !..आणि तुम्ही पुरूष मात्र पावित्र्यं-अपावित्र्याच्या गप्पा करून चेष्टा करता ?.."
"असं होय ?..मग काय करावं आम्ही ??", नांगी टाकण्याशिवाय दुसरं करणार तरी काय म्हणा !
स्वारी जरा जास्तच लाडात आली. लाडे लाडेच म्हणाली," पाळीच्या त्या चार-पाच दिवसात माझं दुखरं अंग तू चेपून द्यायचंस !"
मला हसूच आलं. म्हटलं," देईन की ! त्यात काय ?"
नुसत्या कल्पनेनेच मला गुदगुल्या व्हायला लागल्या होत्या.
तिही खुशीत " एSSS !", म्हणत फक्तं नाचायचीच बाकी होती.
तिला म्हटलं," तुझंही खरंच म्हणा ! त्या दिवसात तुम्हाला कुठे दुखतं-खुपतं समजायला आम्हा पुरूषांना कुठे पाळी येते ?"
"चल हट! वेडा कुठला ?.. दाढी म्हणजे पुरूषाची पाळीच की !"
मीही थोडा विचारात पडलो. विचारता झालो," असंय होय ? अगं, पण दाढी तर मला रोजच येते. मग काय, तू रोजच माझी दाढी कुरवाळत बसणार ?"...😜

No comments