"कोणत्या लेखन कार्यशाळेत लेखनाचं प्रशिक्षण घेतलंत ?" ....
बर्याचदा लोकं विचारतात,"कोणत्या लेखन कार्यशाळेत लेखनाचं प्रशिक्षण घेतलंत ?"
.
कोणत्याच नाही ! म्हणून तर येथपर्यंत पोहोचलो !!.. तरीही लेखनाची सर्वात मोठी कार्यशाळा म्हणजे हे आपल्या आजूबाजूचं जग,माणसं,माणसांनी बनलेला समाज, तेथली साधनं म्हणजे पुस्तकं, नियतकालिकं, आंतरमहाजाल, तुमचा स्वत:चा मेंदू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेंदूला असणारी लेखनाची कधीच न मिटणारी भयंकर खाज ! ही भयंकर खाज तुमच्याकडून एकलव्यासारखी साधना करून घेते, काहीही सोसायचं, भोगायचं,धोका पत्करायचं बळ देते !!
.
यात प्रचंड मेहनत असली तरी जे काही सुचतं,लिहिलं जातं,मांडलं जातं ते मी लिहितो असं मला स्वत:लाच कधी वाटत नाही. कोणतीतरी अगम्यं नैसर्गिक शक्ती,नियती अथवा दैवी शक्ती ते सगळं माझ्याकडून लिहून घेत असते. ही भावना कायम मनात असल्याने मीपणाची मस्ती किंवा माज येत नाही. पण कुणी नाहक त्रास द्यायचा प्रयत्नं केला की, नखं आपोआपच बाहेर येतात. त्याला काही पर्याय नाही.
.
आपण काहीतरी,कितीतरी अचाट,महान वगैरे लेखन करतोय असा कितीही मोठा दंभ एखाद्या लेखकाला असला तरी तो दंभ हा हा म्हणता धुळीला मिळवण्याचं आणि एखाद्या लेखकाचं लेखन तुकोबांच्या गाथेसारखं त्या लेखनात कुणीही,कितीही विघ्नं टाकली तरी तारण्याचं सामर्थ्य सर्वसामान्यं माणसात-वाचकांत असतं. तसं तुम्ही जबरदस्तीने कुणाला प्रेम करायला लावू शकत नाही. सर्वसामान्यं वाचकाला तर मुळीच नाही. पण एकदा का हे सर्वसामान्यं वाचकाचं प्रेम लेखकाला मिळालं की, मग त्याला मरण नाही. लेखकाला तारण्याचं काम वाचक स्वत:च करतात. अजून खूप लिखाण झालं नसलं तरी सुदैवाने मायबाप रसिक वाचकांचं प्रेम आणि आशीर्वाद अल्पावधीतच मिळण्याचं भाग्यं मला लाभलंय. आपल्या वाचकांच्या या प्रेमरूपी आशीर्वादामुळे आणि विश्वासामुळेच कोणतीही आक्रमक जाहिरातबाजी न करताही पुस्तकं लिलया संपून जातात. तसंही आक्रमक जाहिरातबाजीमुळे विक्री वाढवता येते,पण वाचक वाढवता येतो असं मी मानत नाही.जसं ज्योतीने ज्योत लावता येते तसंच वाचकच वाचक वाढ्वू शकतो. वाचकाने पुस्तकाबद्दल काढलेले कौतुकाचे दोन शब्दही जादुई प्रभाव टाकतात,हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे माझ्यासारख्यासाठी वाचक हा देवापेक्षा कमी नाही.

No comments