पुढच्या पिढ्यांचं वाचन कमी होत जाणार,इतर माध्यमं त्यांची जागा घेणार ????....
पुढच्या पिढ्यांचं वाचन कमी होत जाणार,इतर माध्यमं त्यांची जागा घेणार वगैरे भाकड भाकितं मी गेली अनेक वर्षे ऐकत आलोय... भाकड भाकितं खरी होत नाहीत आणि हेही व्हायची शक्यता नाही. काळ कोणताही असो...समाज कोणताही असो,प्रदेश कोणताही असो तेथे वाचणार्यांची संख्या तुलनेने कमीच असते, वाचून विचार करणार्यांची संख्या आणखी कमी,वाचून-विचार करून कार्यरत राहणार्यांची संख्या त्याहीपेक्षा कमी आणि लेखकांची संख्या नगण्यं मानावी इतकीच असते.वाचणारे,त्यावर विचार करणारे आणि लिहीणारे यांचं प्रमाण ज्या समाजात-देशात तुलनेने जास्तं दिसेल तो बिनदिक्कत पुढारलेला समजावा.
.
वाचन हा काही मनुष्य़ाचा अंगभूत गुण नाही. वाचन हा एक संस्कार आहे.संस्कार प्रयत्नपूर्वक करावे लागतात. संस्कार म्हटल्यावर त्यात आपोआपच जबरदस्ती नाही,हे अभिप्रेत आहे. कोणतंही लहान मूल स्वत:हून वाचायला आणि त्याचा अर्थ लावायला शिकत नाही,सुरूवात करत नाही. त्यासाठी पालकांचा आणि शिक्षकांचा त्या मुलांशी संवाद जरूरीचा असतो. लिहिलेलं आपल्याला कळतंय हे लक्षात आल्यानंतर हळूहळू मुलांना लिहिलेलं आवडायला लागतं आणि त्यांतून नंतर त्यांचं वाचनकौशल्यं हळूहळूच विकसित होत जातं. एकदा का आवड निर्माण झाली की,पुढचा मार्ग आपोआपच खुला होत जातो.
आमच्या याला किंवा हिला वाचनाची आवड नाही,खेळ आवडतात,अमकं आवडतं,तमकं आवडतं ही शुद्ध बनेलगिरी आणि त्याही पुढे जाऊन मुर्खपणा आहे. खेळात शारिरीक क्षमतेला महत्वं असतं हे खरं असलं तरी ते अर्धसत्य आहे.शरिरावर नियंत्रण ठेवणं,शारिरीक क्रिया शिकणं या बाबी मेंदूकडूनच पार पाडल्या जात असतात. तेव्हा मेंदूला खुराक हवाच असतो. हा खुराक वाचनातून मिळतो. खेळाची आवड असणार्या मुलांना खेळासंधीची पुस्तकं वाचण्यास प्रवृत्त करणं हा सोपा उपाय आहे. आपली आवड मुलांवर लादण्याऐवजी मुलांच्या आवडीशी संबंधित पुस्तकं त्यांना वाचायला देणं केव्हाही चांगलंच.
.
वाचन कमी होईल ,पुस्तकांची जागा इतर माध्यमं व्यापतील यांसारखं दुसरं थोतांड नाही.छापिल पुस्तकं,वर्तमानपत्र नामशेष होण्याच्या गमजा साठपासूनच मारल्या जाताहेत. पण अजून तसं काही झालेलं दिसत नाही. इंटरनेट किंवा आंतरमहाजालामध्ये पुस्तकांना संपवण्याचं सामर्थ्यं नाही. आंतरमहाजाल हे माहितीच्या महापूरासारखं आहे.तेथे चांगल्या महितीबरोबरच कचरा-चिखलही भरपूर प्रमाणात येतो. तर त्याउलट पुस्तकं-नियतकालिकं ही गाळीव शुद्ध पाण्यासारखी असतात. त्यांचं महत्वं कोणतीही माध्यमं आली तरी कमी होऊ शकत नाही. जरं ते तसं कमी झालं तर समजावं अंतकाळ जवळ आला............. !

No comments