रासपुतीन ते पुतीन
लेखक : - पंकज कालुवाला
प्रकाशक : - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे
पृष्ठे....184 किंमत .......225/-
जग हे नेहमीच निरनिराळ्या स्थित्यंतरांतून पुढे
जात असते. झारच्या प्रचंड रशियन साम्राज्यात कष्ट्करी-कामकरी जनतेला आपल्या
राज्याची व उत्थानाची स्वप्ने दाखविणार्या कम्युनिस्ट राजवटीची स्थापना होणे हेही
इतिहासातले एक मोठे स्थित्यंतर. या स्थित्यंतराला कारक ठरलेले
प्रेरक बल म्हणजे झारची जुलमी राजवट अन ढोंगी व संधीसाधू अवलिया रासपुतीन. झारच्या
साम्राज्याला अखेरची घरघर लागली होती हे खरे असले, तरी त्यावर खर्या
अर्थाने शिक्कामोर्तब केले ते रासपुतीनने. रासपुतीन हा लौकिक अर्थाने रशियाचा
सत्तधीश नसताना पहिले प्रकरण त्याच्या नावाचे आहे हे वाचून अनेकांना आश्चर्य
वाटेल. तो सत्ताधीश नसला तरी रशियन सत्तेची सर्व सूत्रे अप्रत्यक्षरित्या
त्याच्याच हातात एकवटली होती. म्हणूनच सुरूवात त्याच्यापासून. रासपुतीनमुळेच रशियात कम्युनिस्ट राजवट आली, सोव्हिएत
संघ स्थापन झाला व नवं कम्यनिस्ट नेतृत्त्वं उभं राहिलं.तेही नंतर लयाला गेलेलं
जगाने पाहिलं. रशियातलं ते दुसरं मोठं स्थित्यंतर. या दोन स्थित्यंतरांच्या काळात
रासपुतीन ते अलिकडचे पुतीन यांच्यादरम्यान जे नेतृत्त्वं उदयाला आलं होतं,त्याचाच हा अल्पपरिचय. तसं सोव्हिएत संघातील नेतृत्त्वाचं बरचसं चित्रं
नकारात्मक आहे. तरीही त्यांचा अल्पपरिचय देताना त्याकडे सकारात्मक
द्रुष्टीकोनांतून पाहायचा प्रयत्नं केला आहे. हा अल्पंपरिचय आपल्याला आवडेल,भावेल अन अजून खोलात शिरायची इच्छा आपल्याला होइल अशी आशा. ............
अनुक्रम
मनोगत
ग्रेगरी एफीमोविच रासपुतीन
अलेक्झांदर् फेदोरोविच केरेन्स्की
व्लादिमीर इलिच उल्यानोव्ह ऊर्फ लेनिन
जोसेफ विस्सारीओन स्तालीन
जॉर्जी माक्सीमिलीयानोविच मालेन्कोव्ह
निकिता सर्गेई कृश्चेव्ह
लिओनीद व्लादिमीरोविच आंद्रोपोव्ह
कॉंस्तंतीन उस्तीनोविच चेर्नेंको
मिखाईल सर्गेयेविच येल्तसीन
व्लादिमीर व्लादिमीरोविच पुतीन
No comments